Thursday, September 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरक्षाबंधन विशेष... आली नारळी पौर्णिमा...घालू भावाला औक्षण भावा बहिणीचे नाते..सदा जपणारा सण......

रक्षाबंधन विशेष… आली नारळी पौर्णिमा…घालू भावाला औक्षण भावा बहिणीचे नाते..सदा जपणारा सण… – हर्षा भुरे,भंडारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- आज १९ ऑगस्टला सगळीकडेच  रक्षाबंधन दिवस साजरा केला जातो.अशातच भंडारा येथील हर्षा भुरे यांनी रक्षाबंधन दिनानिमित्त शब्दरूपी  काव्य लेखन केले आहे.👇
आली नारळी पौर्णिमा
    घालू भावाला औक्षण
भावा बहिणीचे नाते
     सदा जपणारा सण..१
ताट सजवू सोन्याचा
         दीप उजळवू छान
लोभो दीर्घायुष्य भावा
         देवा मागू वरदान….२
ओवाळून भाऊराया
      राखी बांधूया हाताला
नाते बहिण भावाचे
       वाढे रक्षाबंधनाला….३
नको रूसवा फुगवा
      जपू   मायेचे बंधन
घास भरवू  प्रेमाने
       ठेवू  आनंदीत मन…४
नाते  हळवे राखीचे
    घाली भावनांना साद
नाळ एकाच गर्भाची
     विसरवी सारे वाद…५
धागा  रेशमी  प्रेमाचा
     वेड्या बहिणीची  माया
बंध   अतूट  अनोखा
     जीवलग   छत्रछाया…६
एक नाळ जोडलेले
      जणू  बंध  रेशमाचे
जीव दुखे दोघांचाही
     नाते   अतूट प्रेमाचे…७
भाऊ बहिणीचे नाते
       राखी काळजात ठसे
गोड घास भरवण्या
      ओढ माहेराची असे…८
मन भावाचे दुखते
      ठेच लागता ताईला
नाते हळवे राखीचे
   कळे हे क्षणा क्षणाला .. ९
कृष्ण  द्रोपदीचे नाते
       कलियुगी  झळकावे
बहिणीच्या संरक्षणा
     भाऊ संकटात यावे…१०
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!