Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरी'जन्माने जरी मी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारतो'- विजय वडेट्टीवार -...

‘जन्माने जरी मी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारतो’- विजय वडेट्टीवार – अड्याळ जानी येथे ४५ हजार कोटी रुपये खर्च करून विपश्यना केंद्राची उभारणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :-जन्माने जरी मी बौद्ध नसलो
तरी बुद्धांचे विचार अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो.तथागतांच्या धम्मातील माणुसकीची व प्रेमभावाची शिकवण हीच जगाला खरी शांतीचा संदेश देणारी शिकवण होय; असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ (जानी) येथे ४५ कोटी रुपये खर्च करून विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे.या केंद्राच्या भूमिपूजन तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अतिथी म्हणून थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी,पाली विभागाचे प्रा. फ्रामाहा सुपाचे सुयानो,प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रणिती शिंदे,खासदार बलवंत वानखेडे,खासदार डॉ. नामदेव किरसान,कॅप्टन नटिकेट थाईलंड,सिने अभिनेता गगन मलिक, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे,युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, ॲड.राम मेश्राम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर,ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, सिंदेवाही तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे,कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
सिनेअभिनेते गगन मलिक यांनी बौद्ध धर्माच्या शिकवणीचे महत्त्व पटवून देत धम्मचक्र पुढे नेण्याचे जबाबदारीचे कार्य हे उपासकांवर असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी थायलंड येथील भंते डॉ.फ्रामहा सुपाचै धम्मभणी यांनी उपस्थितांच्या जीवनात सुख, समृद्धीसाठी तथागत गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना केली.प्रास्ताविक डॉ.राजेश कांबळे,सूत्रसंचालन सतीश डांगे,सूरज मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!