Thursday, April 30, 2026
Homeजळगावबापाच्या डोळ्यादेखत विद्युत तारेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू...

बापाच्या डोळ्यादेखत विद्युत तारेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याला शेतात तुटलेल्या वीजेच्या तारेचा शॉक लागला.यामध्ये जागेवरच या मुलाचा मृत्यू झाला.सदरची घटना आज, शुक्रवार १६ ऑगस्टला सकाळी चाळीसगांव तालुक्यातील वाकडी शिवारात घडली.या घटनेत मुलाचे वडील देखील थोडक्यात बचावले.बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिवळटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.सदर घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याचवेळी आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते.आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचना देवून घटनेचा पंचनामा केला.
सदर प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी बालकाचा मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला.वाकडी गाव हे आमदार यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे या गावाशी जवळचे नाते आहे.
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या. महेशच्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे,जे नुकसान झाले ते न भरून निघणारे आहे.मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मृताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!