Tuesday, September 22, 2026
Homeगोंदियाकाळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा... - गोंदियात ईडीची कारवाई..

काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा… – गोंदियात ईडीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-हवाला व्यापाऱ्यासह धान आणि तांदळाच्या बनावट देयकांत गुंतलेल्या शहरातील १२ प्रतिष्ठानांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे मारल्याची माहिती आहे.मागील दोन दिवसांत छत्तीसगड,रायपूरच्या ईडी पथकाने कारवाई करून काहींना अटक करून त्यांना रायपूर येथे नेण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.मात्र, अधिकाऱ्यांनी यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे.गोंदियात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरे करण्याचा व्यवसाय बनावट देयके तयार करून हवाला व्यापाऱ्यांकडून सुरू आहे.छत्तीसगडमधील धानाच्या व्यवसायात तांदूळ घोटाळ्याची कोट्यवधींची रक्कम जिल्ह्यातील व्यापारी आणि हवाला व्यावसायिकांनी रायपूरच्या महादेव ॲपवर हस्तांतरीत केली आहे.त्यावर विविध सामाजिक संस्थांच्या (एनजीओ) माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे.या अंतर्गत ८ व ९ ऑगस्ट रोजी गोंदियात रायपूर येथील ईडीच्या पथकाने गांधी पुतळा,गोरक्षण मार्केट,गणेशनगर व इतर भागांत असलेल्या व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले.यात अनेक व्यापाऱ्यांकडून महत्वाचे दस्तऐवज जप्त केल्याची माहिती आहे. व्यावसायिकांची चौकशी करून काही व्यावसायिकांना ईडीचे पथक रायपूरला घेऊन गेल्याची माहिती आहे.कोट्यवधींची बेनामी रक्कम ऑनलाईन गेमिंग ॲप महादेव ॲपवर ट्रान्सफर केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.असे वृत्त दैनिक नवराष्ट्र वृत्ताने दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!