Monday, July 27, 2026
Homeकोरचीग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- शासकीय,निमशासकीय खुल्या जागेवर व मुख्य रस्त्यांवर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामीण भागात अतिक्रमण वाढतच चालले आहे.अतिक्रमण धारकांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील खुल्या जागेवर,मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार सूचना व नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपुढे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोठे आव्हान उभे राहिले आहे.ग्रामीण भागात गावातील नागरिक ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साहित्य ठेवणे,गायी, म्हशी,गुरे-ढोरे बांधणे व लाकूड फाटा ठेवत असल्याने नागरिकांना आवागमन करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.काही दुकान चालक रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवीतांना मनस्ताप होत आहे.मुख्य रस्ता कमी तर अतिक्रमण जास्त अशी अवस्था झाली आहे. 

गावातील काही बलाढ्य पैसेधारक पैस्याच्या जोरावर चक्क शासकीय जागेवरच अतिक्रमण करून बसले आहेत.खुली जागा दिसली की त्यावर सहजरित्या ताबा मिळवून आपली जागा असल्याचा पावित्रा घेतला जात आहे.ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद नसतांनाही जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामीण भागात आपल्याच मनाचा कारभार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,सचिव यांनी वरिष्ठ स्तरावरुन अतिक्रमण धारकांविरोधात धडक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे जनसमान्यांतुन बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!