Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज आणि आशीनगर भागात कार्यरत दोन स्वच्छता कामगारांना निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणात महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी ही शिस्तभंगाची कारवाई करीत दोन्ही स्वच्छता जमादारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक- २३ मध्ये कार्यरत सफाई कर्मचारी,प्र.स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि आशीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक- २ मध्ये कार्यरत स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से अशी  निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने सर्व सहायक आयुक्त तसेच वरीष्ठ अधिका-यांद्वारे झोनमध्ये विविध ठिकाणी आकस्मिक भेट देत पाहणी केली जात आहे.या पाहणीमध्ये कर्तव्यात कसूर करीत असलेले कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. लकडगंज झोन आणि आशीनगर झोनमधील आकस्मिक पाहणीमध्ये प्र.स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से हे दोघे कर्तव्यात कसूर करताना आढळून आले.त्यामुळे त्यांच्यावर नियमान्वये कारवाई करण्यात आली आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!