Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीमुलचेरा च्या अडपल्ली चक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा...

मुलचेरा च्या अडपल्ली चक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संपूर्ण देशात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली चक येथे उपस्थित मान्यवर,
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामवासीय आदिवासी बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम पहा पहांदीपारो कुपार लिंगोच विशेष अतिथी म्हणून लाभलेले रामचंद्र शेडमाके,प्रकाश कन्नाके,राजू पाटील शेडमाके,वामनराव कन्नाके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पटवारू जुमनाके,चंपत शेडमाके, विनोद गेडाम,सुभाष शेडमाके,रमेश मडावी,दिगंबर परचाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे तर कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून गौरव उराडे हे होते.कार्यक्रमाचा सूत्रसंचालनाची धुरा  तुळशीराम बावणे यांनी सांभाळली.तर कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात आदिवासी गोटुल समिती व आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटनातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था  करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी गोटुल समितीचे अध्यक्ष दिपक शेडमाके,आदिवासी गोंड- गोवारी युवा संघटनेचे अध्यक्ष आकाश नागोसे,सचिन राऊत,राहुल लोहट,प्रणय शेडमाके,शेखर पोरेते, स्वप्निल सुरपाम,शुभम ऊरेते,जितेंद्र परचाके,मयूर बावणे,इमरान पेंदोर,विकी शेडमाके,आकाश राऊत व समस्त ग्रामवासीयांनी परिश्रम घेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!