उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील स्व.तुकाराम धोटे सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नंदकुमार नागोराव बन्सोड वय ५३ वर्षे यांचे काल,दिनांक-३१ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता दु:खद निधन झाले.
ज्ञान दानाचे दार उघडणारे ग्रंथालय कर्मचारी केव्हा तरी सुगीचे दिवस येणार,कधी ना कधी वेतनश्रेणी लागू होणार,या आशेवर जीवन जगत आहेत.मात्र, सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.अशातच गावात व सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेणारे ग्रंथपाल नंदकुमार बन्सोड यांचे दुःखद निधन झाल्याने परिवारावर मोठा आघात झाला आहे.कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी नंदकुमार यांच्यावरच होती.त्यामुळे कुटिंबियांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन दुःखाचे डोंगर कोसळले आहे.नंदकुमार यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,जावई व नात असा मोठा आप्त परिवार आहे.
बन्सोड यांचा अंत्यविधी आज दुपारच्या सुमारास कोकडी येथील गाढवी नदीच्या तीरावर करण्यात आला.

