Tuesday, July 28, 2026
Homeकुरखेडाअती विषारी पट्टेरी मण्यार सापाला सर्पमित्रांनी दिले जिवदान….

अती विषारी पट्टेरी मण्यार सापाला सर्पमित्रांनी दिले जिवदान….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा तालुक्याच्या येरंडी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात आढळलेल्या अती विषारी मण्यार सापाला कुरखेडा येथील सर्पमित्रांनी जंगलात सोडले असल्याने सापाला एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.

साप म्हटला की,अगोदरच अनेकांची भंबेरी उडत असते.पन्नास टक्के नागरिक हे केवळ एखाद्या सापाने दंश केल्यास घाबरल्याने मरण पावत असतात. अशातच येरंडी येथील शेतकरी मुरारी बालाजी पाटणकर यांच्या शेतात रोवणीचे काम सूरू होते. रोवणी सुरू असताना काही मजुरांना पट्टेरी  साप शेतातील विहिरीमद्ये दडून असलेला आढळून आला. लगेच कुरखेडा शहरातील सर्पमित्रांना याबाबत  भ्रमनध्वनीद्वारे सूचना देण्यात आली.सूचना देताच कुरखेडा येथील सर्पमित्र ताराकांत कापगते,सहकारी रोशन मेश्राम,आशूतोष दांडेकर,साहिल सहारे,गणेश चौधरी,दिक्षित बेहार,सुमित गजभिये,शिवम मांडवे यांच्यासह घटणास्थळ गाठून शेतातील विहीरीत दडून असलेल्या सापाला मोठ्या शिताफीने पकडुन त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या जगंलात सूरक्षित पणे सोडत जिवदान दिले.कूरखेडा येथील  सर्पमित्र चमूचे कार्य कौतूकास्पद असून तालूक्यात कूठेही साप निघाल्याची माहीती मीळताच‌‌ ते स्वखर्चाने कोणताही मोबदला न घेता तातडीने घटणास्थळ गाठत निसर्गाचा मित्र असलेल्या सापांना  पकडत सूरक्षित पणे त्यांना जगंलात सोडत जिवदान देत निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहेत

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!