Friday, October 9, 2026
Homeचंद्रपूरशेत कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांवर तीन बिबट्यांनी चढवला हल्ला…-सहा जण गंभीर जखमी…

शेत कामासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांवर तीन बिबट्यांनी चढवला हल्ला…-सहा जण गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यातील मोहाळी येथे आज सकाळच्या सुमारास तीन बिबट्यांनी सहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली.बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाळी हे गाव असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे.आज,१९ जुलै सकाळच्या सुमारास तीन बिबटे गावात आले.लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये ३५ वर्षीय विजय देवगिरकर, ५० वर्षीय मनोहर दांडेकर,३० वर्षीय जितेंद्र दांडेकर, २५ वर्षीय सुभाष दांडेकर,१८ वर्षीय रितिक वाघमारे व ३१ वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे. 

हल्ला केल्यानंतर हे बिबटे गावातील घरांत शिरले असून,वन विभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांनी पकडण्याची मोहीम सुरू केली.दुपार पर्यंत एक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास यश आले आहे.तर उर्वरित दोन बिबट्यांचा शोध सुरू होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!