Monday, August 24, 2026
Homeभंडाराशेतात रोवणी करीत असतांना अंगावर कोसळली वीज; एका महिलेचा मृत्यू तर तीन...

शेतात रोवणी करीत असतांना अंगावर कोसळली वीज; एका महिलेचा मृत्यू तर तीन महिला जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांगली येथे शेतात काम करीत असतांना विज अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाला.तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हि घटना आज,शुक्रवारी दि.१९ जुलै सांयकाळी पाच वाजता घडली.अंतकला नेवारे वय ५० वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.

शेतात रोवणी करीत असताना अचानक वीज पडल्याने अंतकला यांचा मृत्यू झाला.यांच्यासोबतच शेतात काम करत असणाऱ्या महीलांजवळच वीज पडल्याने तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. निला कारंडे,विजया शरणागत,शशिकला शरणागत अशी जखमी महिलांची नावे आहेत.

जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने धानाच्या रोवणीला गती आली आहे.सगळीकडे रोवणीसाठी महिला मजुरांकडून रोवणीची कामे केली जात आहेत. आज सकाळपासून मांगली येथील शेतशिवारात रोवणी सुरू असताना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मजुरांवर वीज कोसळली.यात अंतकला यांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य तीन महिला जखमी झाल्या.हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!