Wednesday, September 16, 2026
Homeचंद्रपूरआईने हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग मनात धरून तरुणीने घेतला गळफास..

आईने हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग मनात धरून तरुणीने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :-वरोरा येथून जवळच असलेल्या वायगाव खडतकर येथे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,गुरुवारी १८ जुलैला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. करिष्मा प्रभाकर मने वय २० वर्षे रा. वायगाव असे मृत तरुणीचे नाव आहे.ती इयत्ता बीए प्रथम वर्ष शिक्षण घेत होती.करिष्मा बराच वेळ मोबाईल बघत होती.त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला.नंतर आई-वडील शेतामध्ये गेले. सकाळच्या गोष्टीचा राग मनात धरून तिने सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय महादेव सुरजूसे करित आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!