Thursday, October 8, 2026
HomeUncategorizedआता शिपाई बनायचे असेल तर द्यावी लागणार  'एमपीएससी' ची परीक्षा…

आता शिपाई बनायचे असेल तर द्यावी लागणार  ‘एमपीएससी’ ची परीक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात शासकीय इमारतीच्या सावलीमध्ये पंखा,कुलरच्या हवेत बसून काम केले पाहिजे; अशी इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे.जो-तो शासकीय नोकरीच्या मागे लागलेला दिसून येतो.शासकीय नोकरीचा हल्ली ट्रेण्ड वाढलेला आहे.अशातच आता राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे टप्प्याटप्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यास मान्यता देण्याबाबतचा शासननिर्णय काल,गुरुवारी जारी करण्यात आला आहे.

ज्या विभागांनी पदभरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस,आयओएन या कंपन्यांबरोबर ३ वर्षांसाठी करार केला आहे; त्या विभागांची पदभरती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत म्हणजे करार संपुष्टात येईपर्यंत या कंपन्यांमार्फतच करायची आहे.त्यामुळे एमपीएससीमार्फत या पदांची भरती २०२६ नंतरच सुरू होणार आहे.

यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी एमपीएससीच्या कक्षेत आणावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव समन्वय समितीकडे सादर करायचा आहे.त्यानंतर समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने एमपीएससीकडे वर्ग करावयाची आहेत,याबाबत समिती सहा महिन्यांत शिफारस करेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!