Monday, July 27, 2026
Homeदेसाईगंजकाँग्रेस नेते रामदास मसराम प्रणित किन्हाळा येथे आरोग्य मेळावा संपन्न…-संपूर्ण कार्याची गल्ली-बोळात...

काँग्रेस नेते रामदास मसराम प्रणित किन्हाळा येथे आरोग्य मेळावा संपन्न…-संपूर्ण कार्याची गल्ली-बोळात प्रसंशा सोबतच ‘मायेची ऊब’…-उत्कृष्ट असे नियोजन; तब्बल १३४७ रुग्णांनी घेतला लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये काल,दिनांक-१३ जुलै रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर मेळाव्यात तब्बल १३४७ रुग्णांनी तपासणी करून आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला. सदर शिबिरातील मेळाव्यास राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे काही कारणास्तव उपस्थित होऊ शकले नाही; परंतु त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांना संबोधित केले हे विशेष.

प्रत्यक्ष दर्शनी माहितीनुसार,काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवारांनी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर मेळाव्यात उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वयोवृध्द महिला-पुरुष मंडळी,सर्वसामान्य नागरिक, गोर-गरीब जनता-जनार्दन आरोग्य सेवेचा लाभ घेतांना दिसून आले.एकूण १३४७ रुग्णांना कसलाही त्रास वा धावपळ झाली नसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले. सदर रुग्णांचे आकडे हे खोटे नसून खरे आहेत.केवळ नुसता देखावा नसून प्रत्यक्षात काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी केलेली कृती आहे.आतापर्यंत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा,कोरची, आरमोरी व देसाईगंज या चारही तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर मेळावे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहेत. शिबिरांमध्ये मसराम हे स्वतः रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत,रुग्ण सेवा देऊन प्रत्यक्षात कृती कार्य करून दाखवीत आहेत.आरमोरी विधानसभा क्षेत्रात आजी-माजी होऊन गेलेत; मात्र आजपर्यंत कुणीही असे कार्य करतांना दिसून आले नसल्याने मसराम यांच्या संपूर्ण कार्याची सर्वत्र गल्ली-बोळात नुसती चर्चाच नाही तर प्रसंशा सोबतच ‘मायेची ऊब’ मिळत आहे.

किन्हाळा येथील आयोजित मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप,नेत्र उपचार,मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणी करून शिबिरात ६४५ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.४०५ रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले तर ७६ रुग्णांची बिएमडी मशिनद्वारे तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून ३५ रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.४० मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यात आले.२२ रुग्णांची इसिजी तर १७ रुग्ण मुत्र खड्याचे व १०७ रुग्ण स्त्रीरोग तपासण्यात आले.

किन्हाळा येथील शिबिरात आयोजक काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्यासह उद्‌घाटक ज्योतीताई श्रीरामे सरपंचा किन्हाळा,अध्यक्ष यादवराव ठाकरे माजी बांधकाम सभा.जी.प.गडचिरोली,प्रमुख पाहुणे मुखरू पत्रे जेष्ठ नागरिक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक माडावार,श्रीराम ठाकरे सामा.कार्य., विजय बुल्ले माजी उपसरपंच,नितीन राऊत माजी उपसभापती देसाईगंज,शंकर गुरुनुले,महेंद्र खरकाटे, देवराव बगमारे सा.कार्य.,अविनाश ठाकरे,काँग्रस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,संजय करनकर उपसरपंच विसोरा,नितु पा.बुध्दे चिखली, शत्रुघ्न गायकवाड,कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत, सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार,बाबुराव राऊत,हितेश तुपट,जयंत दुपारे,अरविंद घुटके पत्रकार आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरास नागपूरच्या सुप्रसिद्ध श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच देसाईगंज ग्रामिण रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली. यशस्वीतेसाठी राजु कावळे,परशुराम ठाकरे,प्रमोद पत्रे, शुभम बुराडे, वैभव शिंगाडे,सुरज कुथे,आशिष वलथरे,रोशन चटारे,विशाल रंधये, निकेश नाकाडे,सागर वाढई,जितू चौधरी,आकाश पेटकुले, रोशन कवासे,दुशंत वाटगुरे,उमाकांत दोनाडकर,रेशीम प्रधान,लंकेश ढोरे,अमोल प्रधान,जयंत सहारे,गोपाल दोनाडकर,महेंद्र मुळे यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!