Wednesday, September 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली महिला व बालकल्याण अधिकारी पाच दिवसीय तालुका दौऱ्यांवर…-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या...

गडचिरोली महिला व बालकल्याण अधिकारी पाच दिवसीय तालुका दौऱ्यांवर…-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या तक्रारींची घेणार दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-महिलांच्या आर्थिक बाबींसह आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुंटुबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनामार्फत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेची नागरी क्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता तसेच मदत केंद्रांचे कामकाजांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदक्कर यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रकाश भांदक्कर हे १५ ते १९  जुलै या कालावधीत जिल्ह्यातील बाराही तालुक्यात नगरपरिषद /नगरपंचायत येथे भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.यावेळी ते संबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या योजनेसंदर्भात समस्याही जाणून घेणार आहेत.भांदक्कर १५ जुलै रोजी गडचिरोली,धानोरा व आरमोरी,१६ जुलै रोजी देसाईगंज,कुरखेडा व कोरची,१८ जुलै रोजी चामोशी, मुलचेरा व एटापल्ली,१९ जुलै रोजी अहेरी,भामरागड व सिरोंचा येथे पाहणी करून आपला अहवाल 

 २२ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांना सादर करतील. नागरिकांनी त्यांच्या समस्या भांदक्कर यांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांच्या संपर्क क्रमांक 9420045030 यावर नोंदवाव्या; असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!