Friday, June 19, 2026
Homeमुंबई'मला माझे काम शिकवू नका'..! असे म्हणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर हक्कभंग दाखल…-एसपी पदावरून...

‘मला माझे काम शिकवू नका’..! असे म्हणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर हक्कभंग दाखल…-एसपी पदावरून तीन वर्षांसाठी बिगर कार्यकारी पदावर बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-आयपीएस अधिकारी जयंत मीना यांनी आमदार रत्नाकर गुट्टे तसेच सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी मीना यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव विधानसभेने काल,शुक्रवारी मंजूर केला.आमदार राहुल कूल यांच्या अध्यक्षतेखालील विशेषाधिकार समितीच्या शिफारशीनुसार विधानसभेने राज्य सरकारला शिफारस केली आहे की,मीना यांची पुढील तीन वर्षांसाठी बिगर कार्यकारी पदावर बदली करावी आणि त्यांच्या सेवापुस्तकात कारवाईची नोंद करावी.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी २०२२ मध्ये मीना यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला होता.गुट्टे यांनी परभणीच्या पोलिस अधीक्षकपदी रुजू झालेल्या मीना यांना अवैध दारूपुरवठा,जुगाराच्या अड्ड्यांबाबत तक्रार केली, तेव्हा मीना यांनी गुट्टे यांना तंबी देत ‘तुम्ही कोणत्या प्रकारे निवडून आलेले प्रतिनिधी आहात? मला माझे काम शिकवू नका,’ असे म्हणत कार्यालयातून हाकलून दिले.या प्रकरणी गुट्टे यांनी हक्कभंग दाखल केला होता.

या शिक्षेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना शिफारस करून आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!