उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरातील पारडी उड्डाण पुलावरून खाली पडून एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज,१३ जुलै ला दुपारच्या सुमारास घडली.योगेश्वर भगत चुटे असे युवकाचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील सलंगटला,सालेकसा येथील रहिवासी आहे.
योगेश्वर चुटे हा भरधाव वेगाने दुचाकी वाहनाने जात असताना त्याची अनियंत्रित मोपेड एकीकडे पडली तर तो साईनेज बोर्डसह दुसरीकडे पुलाखाली पडलेला होता. डोक्यात हेल्मेट नसल्याने खाली पडताच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला परिसरातील नागरिकांनी लगेच जवळच्या रुग्णालयात नेले.मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले व मेडिकलला नेण्यात आले.तो नागपुरातील सुभान नगर इंदिराबाई तिड़के कॉलनीत वास्तव्यास होता.योगेश्वर हा भारत फायनान्समध्ये नोकरीला असल्याचे कळते.

