Sunday, June 21, 2026
Homeमुंबईसरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच-चांदी; महागाई भत्त्यात राज्य सरकारने केली वाढ…-१ जानेवारी २०२४ पासून...

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदीच-चांदी; महागाई भत्त्यात राज्य सरकारने केली वाढ…-१ जानेवारी २०२४ पासून मिळणार महागाई भत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जावी; अशी मागणी होती.वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारीत महागाई भत्त्याचा दर ठरवण्यात आला आहे.याला राज्य सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ४६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आला आहे.या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाली आहे.ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.त्यानुसार,जानेवारीपासून जूनपर्यंत असलेली थकबाकी जुलै महिन्याच्या पगारात दिली जाईल,असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.शासकीय,निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!