Saturday, April 18, 2026
Homeकुरखेडाजंगली हत्तींचा कुरखेडा तालुक्यात बस्तान…-हत्तींच्या आगमनाने शेतकरी धास्तावले…

जंगली हत्तींचा कुरखेडा तालुक्यात बस्तान…-हत्तींच्या आगमनाने शेतकरी धास्तावले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 कुरखेडा(गडचिरोली):– गेल्या अनेक दिवसांपासून धानोरा तालुक्यात भ्रमंती केल्यानंतर जंगली हत्तींचा कळप कुरखेडा तालुक्याकडे वळला आहे.कुरखेडा तालुक्यातील गंगसायटोला परिसरात हत्तींनी तळ ठोकला होता.आता हत्तींचा कळप येथून भ्रमंती करीत कुमुडपार जंगलात पोहोचला आहे. त्यामुळे परिसरात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे.कुरखेडा तालुक्यात हत्तींच्या आगमनाने शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा,कुरखेडा, देसाईगंज,आरमोरी,गडचिरोली तालुक्यातील जंगलात भ्रमंती करीत आहे.काही दिवसांपूर्वी हा कळप नजीकच्या गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील दाखल झाला होता. तेव्हापासून जिल्ह्याच्या विविध भागात रानटी हत्ती ठाण मांडून आहेत.अलीकडेच कुरखेडा तालुक्यातून हत्तींचा कळप धानोरा तालुक्यात छत्तीसगड सीमेवर पोहोचला होता.त्यामुळे कळप पुन्हा छत्तीसगड राज्यात जाईल,अशी अपेक्षा होती.मात्र,धानोरा तालुक्यातील जंगल परिसरात काही काळ वास्तव्य केल्यानंतर कळपाने पुन्हा कुरखेडाचा रस्ता धरला आहे.नुकतेच कळपाने तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गंगसायटोला येथे प्रवेश केला.आता पुढे हा कळप कुमुडपार जंगल परिसरात पोहोचला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!