Friday, October 23, 2026
Homeभंडाराशाळेतील स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा मृत्यू…

शाळेतील स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतील स्वच्छतागृहात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवारी ३ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली.यशस्वी सोपान राऊत वय ६ वर्षे असे घटनेतील मृत बालिकेचे नाव आहे.

यशस्वीने यावर्षी गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता.१ जुलै रोजी नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या. यशस्वी पहिल्या दिवसापासून शाळेत नियमित हजर होती.आज,बुधवारी सकाळी यशस्वी शाळेत गेली होती.तिथे ती स्वच्छतागृहात गेली असता,तिचा स्पर्ष सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या तारांना झाला.यामुळे विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला.

अन्य विद्यार्थिनी या स्वच्छतागृहात गेल्या असता, त्यांना यशस्वी बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. विद्यार्थीनींनी घटनेची माहिती तात्काळ शिक्षकांना दिली.शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.शाळेला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असतानाच मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!