Sunday, August 30, 2026
Homeमुंबईआता दुसऱ्या अविवाहित महिलेलाही 'माझी लाडकी बहिण' योजनेचा मिळणार लाभ…

आता दुसऱ्या अविवाहित महिलेलाही ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा मिळणार लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत महाराष्ट्रातील महायुती सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवीन नियमांनुसार एका महिलेचे लग्न झाले असेल तर दुसऱ्या अविवाहित महिलेलाही हा लाभ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज मिळावा; यासाठी राज्य सरकार अटी व शर्ती सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.सरकारने अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला आणि इतर काही नियम मंगळवारी शिथिल केल्यानंतर आणि अर्जाची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर सरकारने बुधवारी या योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची घोषणा केली.

फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत कुटुंबनियोजन करून आपण काही चूक केली आहे का?, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू नये.कोणतीही विषमता नाही हे लक्षात घेऊन एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!