Thursday, April 30, 2026
Homeकुरखेडासमस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप…-कुरखेडा तालुक्यातील घटना…

समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप…-कुरखेडा तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- दोन वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा नळ योजनेचा बांधकामावेळी वार्ड क्र.१ मधील नालीची मोडतोड होत येथून सांड पाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामसभेने काल,दिनांक-२५ जून रोजी घाटी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

मागील दोन वर्षांपासून नळ योजनेचे हे काम सुरू आहे.बांधकामा दरम्यान तुटलेल्या नालीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने या वार्डात ठिकठिकाणी सांडपाणी साचत दुर्गंधी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर परीस्थीती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिति मार्फत अनेकदा संबंधित कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र,याकडे सातत्याने दूर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!