उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १८ जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करतील.पंतप्रधान मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयांचे हप्ते हस्तांतरित करणार आहेत.यामध्ये २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.
यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जारी करण्यात आला होता. यामध्ये २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये वर्ग करण्यात येते.

