Saturday, June 27, 2026
Homeनागपूरसाहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच कंत्राटदाराने उचलली बिलाची रक्कम…-१३ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि...

साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच कंत्राटदाराने उचलली बिलाची रक्कम…-१३ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नागपूर :- नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ४९ अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन घोटाळ्याची चौकशी लेखा अधिकारी यांच्या तीन सदस्य समितीतून करण्यात आली.या चौकशी अहवालाच्या आधारावर नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार देण्यात आली होती.त्यानूसार पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत १ कोटी ६ लाख रुपयांचा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता; तो निधी तालुक्यांना देण्यात आला होता. यामध्ये ४९ अंगणवाड्यांना श्रेणीवर्धन करण्यासाठी साहित्य पुरवायचे होते.

साहित्य पुरवण्यापूर्वी कंत्राटदाराने बिलाची रक्कम उचलली.त्यामुळे घोटाळा झाल्याच्या तक्रारी नंतर चौकशी समिती नेमण्यात आली.या १३ गटविकास अधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसह श्री बुक डेपो जनरल स्टोअर यवतमाळ,शांभावी एज्युकेशन नागपूर, रुषालीएम्पोरियम नागपूर यांच्या विरोधातही फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!