Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरमोटारसायकल धुण्याच्या नादात १५ वर्षीय मुलाने गमावला जीव…-मुलाचा खड्ड्यात बुडून मृत्यू..

मोटारसायकल धुण्याच्या नादात १५ वर्षीय मुलाने गमावला जीव…-मुलाचा खड्ड्यात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर चंद्रपूर वन परिक्षेत्राच्या वतीने वन उद्यानाचे काम सुरू झाले आहे.याठिकाणी वनविभागाने मोठा खड्डा खोदला असून,त्यात बोअर खोदण्याबरोबरच जवळच्या पाईपलाईनमुळे खोल खड्डा पाण्याने भरला आहे.या खोल खड्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.ही दुदैवी घटना काल,रविवारी दिनांक -२ जून रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. 

प्राप्त माहितीनुसार दुर्गापूर मेजर गेट जवळील राममंदिरच्या मागे राहणारे तनवीर शेख रहमान (वय १५ वर्ष,दादमहल वार्ड,हनुमान खिडकी निवासी आर्यन साईनाथ यलगमवार वय १६ वर्ष,भंगाराम मंदिर भिवापूर वार्ड निवासी क्रिष्णा जितेंद्रकुमार साहू आणि सकलेन हमीद खान पठान वय २० वर्ष हे चारही जण मोटरसायकल क्र.एमएच ३४ सीसी ५४४४, एमएच १२९५ ने दुपारी १ वाजता लालपेठ कॉलरी बंकर जवळ वनविभागद्वारा खोदलेल्या खड्याजवळ पोहोचले.तनवीरने हिंमत दाखवून मोटारसायकल धुण्यासाठी पाण्याच्या खड्यात प्रवेश केला.मात्र,पाण्यात खड्ड्याची खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.दरम्यान त्याचे दोन मित्र आर्यन आणि कृष्णा यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र,तनवीर पाण्यात बुडाल्यावर सर्वजण अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपापल्या घरी पोहोचून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती तात्काळ शहर पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाची मदत घेत पाण्यात बुडालेल्या तनवीरचा मृतदेह बाहेर काढला.पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!