Sunday, May 3, 2026
Homeनागपूरनागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक कोकरे अडकला 'एसीबी' च्या जाळ्यात…-बिअर बारच्या...

नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक कोकरे अडकला ‘एसीबी’ च्या जाळ्यात…-बिअर बारच्या परवान्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाच खोरीचे प्रकरण ताजेतवाने असतानाच बिअर बारच्या परवान्यासाठी सव्वातीन लाखांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल,गुरुवारी ही कारवाई केली.रवींद्र लक्ष्मण कोकरे वय ४९ वर्षे असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार युवकाला बिअर बार सुरु करायचा होता व त्यासाठी एफएल-३ परवाना हवा होता.त्या युवकाने दस्तऐवज पूर्ण देत रवींद्र कोकरे यांच्याकडे अर्ज केला.ती फाईल मंजूर करून अधीक्षकांकडे पाठविण्यासाठी कोकरेने चार लाखांची मागणी केली. तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करीत गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सापळा रचला.चार लाखांऐवजी सव्वातीन लाखात काम करण्याची कोकरेने तयारी दाखविली.

ट्रॅफिक पार्कजवळ तरुणाकडून लाच घेताना कोकरे याला एसीबीच्या पथकाने अटक केली.दुसऱ्या पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिस निरीक्षक प्रवीण लाकडे,सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम,विकास सायरे,राजू जांभूळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.कोकरेची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!