Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने आज शुक्रवारी जामीन मंजूर केला.त्यांनी २ जूनला पुन्हा स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावे; असे कोर्टाने म्हटले आहे.

केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता यावा; म्हणून कोर्टाने हा निर्णय दिला आहे.२१ मार्चपासून केजरीवाल ईडीच्या कोठडीत आहेत.”ही अटक आधी किंवा नंतर व्हायला हवी होती.आता आम्ही २१ दिवस देत आहोत, “असे जस्टीस संजीव खन्ना म्हणाले.

केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका केली आहे.त्यासह या प्रकरणावरची सुनावणीही लवकरच पूर्ण करणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.अद्याप निकालाची कॉपी मिळालेली नसल्याने या जामीनाच्या आणखी काय अटी असतील हे समोर आलेले नाही.यापूर्वी झालेल्या सुनावणीत केजरीवालांच्या जामीन आर्जाला ईडीने विरोध केला होता.निवडणुकीचा प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही किंवा घटनात्मक अधिकारही नाही,असे ईडीने गुरुवारी म्हटले होते.

जस्टिस संजीव खन्ना यांच्या पीठाने केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आज,शुक्रवारी निर्णय देणार असे स्पष्ट केले होते.अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!