Friday, May 1, 2026
Homeनागपूर५० हजार रुपयांची पैज लावणे तिघांना चांगलेच पडले महागात…-विनयभंग केल्या प्रकरणी तिघांना...

५० हजार रुपयांची पैज लावणे तिघांना चांगलेच पडले महागात…-विनयभंग केल्या प्रकरणी तिघांना पोलिसांनी केली अटक; नागपुरातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- अनोळखी महिलेचा फोन नंबर आणण्याची तीन जणांनी ५० हजार रुपयांची पैज लावली होती. मात्र ही पैज लावणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे.यात पन्नास हजार रुपयांची पैज लावणाऱ्या तिघांना महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

सदरचा प्रकार नागपूरमध्ये घडला असून पोलिसांनी मनोज छाबरा,राजेश तालरेजा आणि सुधीर कुऱ्हाडकर या तिघांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात तीन मैत्रीणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या.दरम्यान त्याच ठिकाणी तिघे मित्र हे सुद्धा जेवायला आले होते.जेवण सुरू असताना त्यांनी महिलाबद्दल टिपणी केली.मात्र महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले.पण ते तिघे एवढ्यावर न थांबता त्यांनी हद्द पार करत महिलेशी जाऊन बोलणे आणि मोबाईल नंबर आणल्यास ५० हजार रुपये देऊ असे ठरवत पैज लावली.

यात ठरल्यानुसार त्यांनी महिला राहत असलेल्या अपार्टमेंट पर्यंत पाठलाग केला.त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करत महिलेच्या मनाविरुद्ध कृत्य केल्याने विनयभंग केल्याची तक्रार सादर पोलिसांत केली. यात पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला असता यात तिघांचे नाव समोर आले.त्यानंतर एक जण हा नागपुरातील असून त्याच्याकडून माहिती घेत दोघांना अमरावती येथून ताब्यात घेतले आहे.तसेच अश्या घटना घडल्यास दुर्लक्ष न करता पोलिसांशी संपर्कसाधण्याचे आवाहन उपायुक्त राहुल मदने यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!