Sunday, September 20, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर शहरातील एटीएम मधून पैसे चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश….

चंद्रपूर शहरातील एटीएम मधून पैसे चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून एटीएम मशीन मध्ये सिल्व्हर रंगाची पट्टी लावून पैसे चोरणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलीसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार काल, रविवारी १४ एप्रिलला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील सिंधी कॉलनी,दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता; अज्ञात इसमाने एटीएम मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन लक्ष विचलीत करून ५ हजार रूपये चोरून नेली अशी तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन,रामनगर येथे दाखल केली. सदर तक्रारीवरून कलम ३७९ भादंवि गुन्हा नोंद करून तपासालां सुरुवात केली.

चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम मधील पैसे चोरीच्या घटना लक्षात घेता,पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक,सुनिल गाडे, पोलीस स्टेशन, रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक,रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवुन परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले.गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी कार्तीक शंकर मामीडवार वय २७ वर्ष रा.लालपेठ कॉलरी, बाबुपेठ चंद्रपूर तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन गुन्हयातील फिर्यादी हिचे चोरून नेलेले पैसे जप्त करण्यात आले.आरोपी तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांना अधिक विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी चंद्रपुर शहरात अंदाजे ५-७ ठिकाणी एटीएम मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला.तसेच बल्लारशाह येथे सुध्दा पेपर मिलचे समोरील एटीएम मधुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून पाच हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.चंद्रपूर पोलीसांनी चंद्रपुर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, एटीएम मशिन मधिल पैसे निघण्याचे ठिकाणी सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे अडकल्याचे भासवुन थोडया वेळानी सिल्वर रंगाची पट्टी काढुन पैसे चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे.नागरीकानी सर्तक राहून असे प्रकार आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी; असे आवाहन चंद्रपूर पोलीसांनी केले आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु,उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो.नि.यशवंत कदम तसेच गुन्हे शोध पथक,रामनगर पोलिसांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!