Sunday, September 20, 2026
Homeकोंढाळाईव्हीएम मशीन मध्ये गळबळ नाही; आपल्या डोक्यात आहे गळबळ - प्रदेशाध्यक्ष नाना...

ईव्हीएम मशीन मध्ये गळबळ नाही; आपल्या डोक्यात आहे गळबळ – प्रदेशाध्यक्ष नाना पडोले- कोंढाळा येथे डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पडोले यांची जाहीर सभा संपन्न…-

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा (देसाईगंज) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे आज दिनांक- १५ एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पडोले यांची जाहीर सभा आज दुपारी १ वाजेच्या सुमारास संपन्न झाली.सदर प्रचार सभेप्रसंगी गावातील तसेच देसाईगंज तालुक्यातील हजारोंच्या वर कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

सदर प्रचार सभेप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पडोले यांची प्रकृती बरी नसूनही त्यांनी प्रचार सभेत उपस्थिती दर्शविली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.नाना पडोले यांना काही दिवसांपासून ज्वरताप येत आहे; मात्र गोर-गरीब जनतेच्या हितासाठी जीवाची पर्वा न करता पुढे धजावित असल्याची हल्ली प्रचिती निदर्शनास येऊ लागली आहे.आज झालेल्या सभेमध्ये त्यांनी म्हटले आहे की,ही लढाई अभी नही तो कभी नहीं,लोकशाही वाचली पाहिजे; अन्यथा सदर लढाई इथेच संपणार आहे.मी एका मिनिटात खासदारकी सोडली कारण की,नुसत्या भूलथापा देण्यात बिजेपि सरकार माहिर झाले आहेत.यापूर्वी नोटबंदी झाली; ती कुणासाठी? जी एस टी ची रक्कम कुणाच्या घश्यात जात आहे? बनिया जे वर्षाकाठी ६ रुपये पाठवतात ते कुठून पाठवितात; शेतकऱ्यांकडून १८ टक्के जी एस टी ची रक्कम वसूल करूनच; सध्याच्या घडीला नवीन ट्रेंड वाढलेला आहे; अशातच बैल बंडी तसेच बैलांनी कुणीही शेती करीत नाही. इतर ट्रॅक्टर व साहित्यांच्या किंमती वाढल्या असून  महागाई चार पटीने वाढली आहे.मी राजकारणी परिवारातील नाही; मी शेतकऱ्यांना पोरगा आहे.

मला हरमाचे खाणे आवडत नाही.मी बहुजन तसेच इतरांसाठी झटणारे नेता आहे.मतविभाजनासाठी पैसे दिली जातात; आपल्या लोकांचे मतविभाजन कसे केले जाते हे तुम्हां-आम्हाला माहीत नाही.ईव्हीएम मशीन मध्ये गळबळ नाही आपल्या डोक्यात गळबळ आहे.

प्रसंगी नाना पडोले यांनी म्हटले की,पेपर लीक करणाऱ्यांना जन्मठेप,शेतकऱ्यांसाठी एम एस बी चा कायदा- दीड पट मालाला हमी भाव,गरीब महिलांना १ लाख रुपये दरवर्षी,शेतकऱ्यांसाठी लादण्यात आलेली जी एस टी रद्द,शेतकरी बांधवांची लोडशेडींग बंद,वन हक्क पट्टे धारक यांना १ वर्षाच्या आत सात-बारा सहित जमिनीचे पट्टे देण्यात येणार; गडचिरोली जिल्ह्यातील लुटण्यात येणारे सोने बंद करण्यात येणार,आदिवासी आणि वनवासी कोण?  हे त्यांना अजूनही कळले नाही.त्यामुळे अशांना धडा शिकवणे गरजेचे आहे.मोदी ची गॅरंटी ही केवळ वॉशिंग मशीन धुलाई सारखी असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाना पडोले यांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे सगळ्यांनी एकजूट होऊन काँग्रेस पक्षाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना बहुमतांनी विजयी करा; असेही प्रचार सभे प्रसंगी त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!