Thursday, June 4, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथे मुस्लिम बांधवाकडून बौद्ध बांधवाना शरबतचे वितरण…-डॉ.आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी…

कुरखेडा येथे मुस्लिम बांधवाकडून बौद्ध बांधवाना शरबतचे वितरण…-डॉ.आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून काल,१४ एप्रिल रोजी कुरखेडा येथील समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने शहरात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मिरवणूक  जामा मस्जिद समोर पोहचताच बौद्ध समाज बांधवांचे मुस्लिम समुदायाचा वतीने स्वागत करून डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या शूभेच्छा देण्यात आल्या व उपासक,उपासिका यांना शरबतचे वितरण करण्यात आले.

कुरखेडा शहरात सर्वधर्म समभावाची जूनी परंपरा आहे.येथील हिंदू,मुस्लिम, बौद्ध बांधव तसेच इतर नागरीक नेहमीच एकमेकां सोबत सलोख्याची भावना मनात ठेऊन; सर्वांच्या सूख दूखात तसेच सन सभारंभात सहभागी होत असतात.काल,रात्री मस्जिद समोर आयोजित शरबत वितरण कार्यक्रमात मुस्लिम समाज मंडळाचे अध्यक्ष मसूद शेख,आसिफ शेख,साजीद शेख,उस्मान खान,शमीम शेख,शादाब खान,जमील शेख,जिया सय्यद,सोहेल पठान,फाजील शेख,फैजान शेख,बंटी जमील,फ़ीरोज़ ख़ान,जामीन कूरेशी,मूजाहीद शेख,नावेद शेख,जमीर कूरेशी,सादिक शेख,रेहान खान,मीजान शेख, मून्ना शेख, सलमान पठान, तौकीर शेख,मोनू पठान, फ़ीरोज़ शेख व मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!