Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीमतदान १९ एप्रिल रोजी व मतमोजणी ४ जून रोजी-पाच पेक्षा जास्त व्यक्ती...

मतदान १९ एप्रिल रोजी व मतमोजणी ४ जून रोजी-पाच पेक्षा जास्त व्यक्ती मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणार नाहीत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर (अ.ज.)लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान १९ एप्रिल रोजी व मतमोजणी ४ जून रोजी आहे.सदर निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू केले आहे.मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करताना पाच पेक्षा जास्त व्यक्ती (संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत.कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत.मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल; असे कृत्य करता येणार नाही.मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करण्यास व निषिध्द वस्तू बाळगण्यास मनाई असेल. मतदान आणि मतमोजणी सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही.मतदान व मतमोजणी केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहिल.मतदान / संबंधित मतदान केंद्रावर १९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ३ वाजता पर्यंत,मतमोजणी / मतमोजणीचे ठिकाणी ४ जून रोजी सकाळी ७ ते निकाल घोषित करेपर्यंत आदेशाचा अंमल राहील; असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय दैने यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!