Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह सहा नक्षलवादी ठार ….

नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह सहा नक्षलवादी ठार ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात आज,बुधवारी दिनांक -२७ मार्च रोजी सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली.येथील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह सहा नक्षलवादी ठार झाले; अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता.

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावांच्या जंगलात गोळीबार सुरु झाला, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान या कारवाईत सहभागी झाले होते, असे ते म्हणाले.”ही चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावर एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.” या भागात अद्याप शोधमोहीम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे.त्यापूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!