उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- किती हास्यास्पद म्हणावे; ‘तो’ स्वतः व ७०० रुपये ते ८०० रुपये रोजीचा कार्यकर्ता घेऊन दिवसभर अनेकांकडून केव्हा २०० तर केव्हा ५०० रुपये तसेच इतर रक्कम वसूल करूनही ‘तो’ मी नव्हेच अशी भूमिका बजावत असल्याने याचे नवल वाटत आहे.अशातच सकाळ पासून अनेकांच्या घश्यात उतरतोय दारूचा घोट..तरी ‘तो’ ट्रॉफीकवाला साहेब म्हणतोय पिणाऱ्या व्यक्तीची ‘एम एल सी’ करावी लागणार? किती जणांच्या ‘एम एल सी’ करताय राव? सकाळ पासून ते रात्रौ झोपेपर्यंत जनतेसाठी झटणारे एका विभागाचे तथाकथित कार्यकर्ते धुंदीत असतात.अनेकांना याबाबतीत माहिती आहे; मात्र अनेकजण घाबरून झाकली मूठ सव्वा लाखाची करीत असतात.गडचिरोली जिल्ह्यातील एका ‘त्या’ पोलीस ठाण्याजवळच एका पाणठेल्यात विदेशी दारूचा महापूर वाढला असून एका विभागातील कार्यकर्ते सकाळ पासूनचा ठरलेला वेळ तसेच सायंकाळचा ठरलेला वेळ ठरवून विदेशी दारू पिऊन झांगडगुत्ता करीत असतात.हे कुणालाही दिसत नाही कां?जनतेची कामे करण्यासाठी दारू पिऊन खुर्चीवर बसणारा त्याला साधा धड बोलताही येत नाही तसेच उलट मी पिऊन आहे ; असे छाती ठोक पणे सांगतो; त्याचीच बाजू घेतली जाते; ही शोकांतिका आहे.अशांची ‘एम एल सी’ कां नाही? याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. मात्र ‘तो’ ट्रॉफीकवाला साहेब अनेकांचे बचाव कार्य करून वसुलीचे सत्र तर राबवित नाही ना? अशी शंका बळावली आहे
मात्र इतरांना दारू पिऊन आल्या बद्दल ‘एम एल सी’ करण्याची धमकी वजा बोलणी करतो आहे. नेमकी ‘एम एल सी’ म्हणजे काय? ‘त्या’ कार्यकर्त्याला कळले की,काय? हे ….समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.एखादा व्यक्ती अरे रावीची भाषा वापरीत नसेल तरी सुद्धा आपल्या पदाचा रोप झाडून दाबण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे.नाहीतर उगीचच पोमाडेंगी; असे व्हायला नको? याबाबत कित्येकजण सुज्ञ तसेच कित्येकजण पॉश प्रणाली वापरून आपला बोलबाला करीत आहेत; हे माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये ‘एक अर्ज एक विषय ‘ यानुसार माहिती मागविण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

