Sunday, September 6, 2026
Homeब्रम्हपुरीट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू - ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू – ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव (देऊळगाव) येथिल वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दबून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय २० रा.देऊळगाव,असे मृतक तरुणाचे नाव आहे.

मागील वर्षी ब्रह्मपुरी तालुक्यातील काही रेती घाटांचा लिलाव झालेला होता.बेलगाव (देऊळगाव)येथीलही रेती घाटाचा लिलाव झाला होता.मुदतीमध्ये रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील स्वतःला राजकीय पुढारी मानणारा नेता व भंडारा जिल्ह्यातील एका रेती व्यवसायिकाने शिल्लक रेती साठा विक्रीची परवानगी प्राप्त केली.या परवानगीच्या नावावर ठेकेदाराने नदीपात्रामधून गुरुवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने रेती उपसा करण्याचा काम सुरू केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले.वैनगंगा नदी पात्रातून रात्री ट्रॅक्टर द्वारे रेती उपसा करण्याचे काम सुरू होते.अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवानजी यांनी सर्व ट्रॅक्टरवाल्यांना ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले. दरम्यान देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीच्या असलेल्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून असलेला प्रणय गुरुदेव धोटे यांनीही ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटात जवळ असलेले शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.ही घटना घडतात ठेकेदाराची सर्व माणसे घटनास्थळावरून पसार झाली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती काही वेळ कुटुंबीयांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार व पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कावळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थितांना व कुटुंबीयांना समजावून सांगितले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!