Wednesday, June 3, 2026
Homeदेसाईगंजरानटी हत्तींच्या कळपाने धान पिकासह इतर साहित्यांची केली नासधूस….

रानटी हत्तींच्या कळपाने धान पिकासह इतर साहित्यांची केली नासधूस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- रानटी हत्तीच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यात गत दोन-तीन वर्षांपासून ठाण मांडले आहे.देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतात दोन दिवांपूर्वी पहाटेच्या सुमारास हत्तीच्या कळपाने धुडघूस घालून धान पिकासह इतर साहित्याची नासधूस केली.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हत्तींच्या कळपाने धान पिकात शिरून उभे धानपीक जमिनीत गाडले तर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेली पाइपलाइनही फोडली. कुंपण केलेले तार तोडल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव, चिखली, विहिरगाव, शिवराजपुर या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीच्या कळपाचे वास्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी व इत्तर पिकांचे हत्तींकडून नुक नुकसान केले जात आहे.हत्तींच्या भीतीपोटी शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथील पुरुषोत्तम गेडाम, अरुण गुरनुले, सुखदेव शंभरकर, परमेश पिलावान, अनिल गेडाम, शेषराव बलथरे या शेतकऱ्यांच्या शेतात दोन दिवांपूर्वी पहाटेच्या सुमारास हत्तीच्या कळपाने शेतात शिरून उभे धानपीक जमीनदोस्त केले असल्याने यावर त्वरित वनविभागाने आळा घालावा; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!