Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता देशातील ग्रामीण भाग इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी…-शहरी भागालाही टाकले मागे….

आता देशातील ग्रामीण भाग इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी…-शहरी भागालाही टाकले मागे….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- भारतातील ग्रामीण भागाने इंटरनेटचा वापर करण्यात शहरी भागांना मागे सोडल्याचे आढळून आले आहे.इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या २०२३ मधील आपल्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे.

सदर अहवालानुसार,२०१९ पर्यंत शहरी भाग इंटरनेट वापरण्यात आघाडीवर होते.चार वर्षांनंतर मात्र मोठा बदल झाला असून,आता देशातील ग्रामीण भाग यात अव्वलस्थानी आला आहे.२०२३ मध्ये ग्रामीण इंटरनेट यूजर्सची संख्या ४४२ मिलियन इतकी असून,शहरी यूजर्सची संख्या ३७८ मिलियन आहे.भारतात सध्या ८२० मिलियन यूजर्स असून,यापैकी ५२ टक्के ग्रामीण यूजर्स आहेत.तसेच,यादीत १० टक्के मोठी शहरे आहेत.२३ टक्के लहान मेट्रो शहरे समाविष्ट असून, त्यांची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे.

कधी काळी इंटरनेट वापरण्यात फक्त शहरी लोकच समोर असल्याचे सांगण्यात येत होते.परंतु,आता काळ बदलला आहे.शहरी लोक काही अंशी पैसेवाले असले तरी त्यांच्यासोबत इंटरनेट वापरण्यात ग्रामीण भारत जोरदार टक्कर देत आहे.दरम्यान,भारताची निम्मी लोकसंख्या महिला सुद्धा इंटरनेटच्या जगात समोर गेल्या आहेत.अगर महिला तसेच पुरुषांच्या इंटरनेट वापरण्याची तुलना केल्यास भारतात एकूण इंटरनेट यूजर्समध्ये ५४ टक्के पुरुष असून,४६ टक्के महिलांचे प्रमाण आहे.भारतातील व्यक्ती रोज सुमारे ९८ मिनिटे अर्थात २ तास इंटरनेटवर खर्च करतात.शहरांतील हेच प्रमाण १०१ मिनिटे आहेत.ग्रामीण भागात ९४ मिनिटे रोज इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.देशात इंटरनेटद्वारे व्हिडियो,ऑडिओसोबत ओटीटी सर्वांत जास्त पाहण्यात येते.भारतात ५ पैकी एक इंटरनेट यूजर केवळ व्हिडियो पाहतो.शहरांत ४ पैकी १ यूजर ऑनलाइन शॉपिंग करत असून,म्युझिक स्ट्रीमिंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!