Sunday, August 23, 2026
Homeनवी दिल्लीप्रजासत्ताक दिनी असणार आगळेवेगळे व्हीआयपी..-व्हीआयपी रांगांत बसणार रिक्षाचालक,भाजीविक्रेते, मजूर...

प्रजासत्ताक दिनी असणार आगळेवेगळे व्हीआयपी..-व्हीआयपी रांगांत बसणार रिक्षाचालक,भाजीविक्रेते, मजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली :- यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मुख्य व्यासपीठासमोर आगळेवेगळे व्हीआयपी असणार आहेत.यंदा या रांगेत भाजी विक्रेते, रिक्षाचालक,बांधकाम मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदराने आमंत्रित करण्यात आले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे सूत्र सर्वसामान्यांचा सहभाग हे असणार आहे.त्यामुळेच श्रमजीवीवर्गाला मानाच्या रांगेत बसून जगविख्यात असे पथसंचलन बघण्याचा आनंद घेता येणार आहे.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राजपथचे ‘कर्तव्य पथ’ झाल्यानंतरचा हा पहिलाच सोहळा असणार आहे. मुख्य व्यासपीठासमोर नेहमी व्हीआयपी मंडळींसाठी विशेष रांग असते.त्यात देश-विदेशातील व्हीआयपी असतात.यंदा त्यांच्या जागी रिक्षाचालक,भाजी विक्रेते, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी दिवसरात्र राबलेले मजूर, छोटे दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या व्हीआयपी रांगेत बसण्याचा मान देण्यात आला आहे. यंदाच्या संचलनासाठी आसन व्यवस्था घटवून ४५ हजार करण्यात आली आहे.त्यापैकी ३२ हजार आसनांचे ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधाही देण्यात आली

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सिसी यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.मुख्य संचलनातही यंदा इजिप्तचे १२० जवानांचे पथक सहभागी होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!