Wednesday, September 9, 2026
Homeमुंबईराज्यातले सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले….-विजय वडेट्टीवार

राज्यातले सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले….-विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-  राज्यातले सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.महिला सुरक्षित नाहीत.राज्यात दुःशासनाच्या औलादी मोकाट फिरताहेत.त्यामुळे साड्यांऐवजी सरकारने महिलांना शस्त्रे वाटावीत;  यामुळे त्या स्वतःचे संरक्षण करू शकतील; अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत राज्य सरकारवर तोफ डागली.अंतरिम अर्थसंकल्पात महिलांना साड्यावाटप करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.त्याचा संदर्भ देत वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली.ते म्हणाले,यंदाचा अर्थसंकल्प उधळपट्टीचा,भ्रष्टाचाराला वाव देणारा आणि राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा आहे. अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक स्मारकांच्या घोषणा केल्या.निधीची घोषणा केली.मात्र,अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक,इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा त्यात साधा उल्लेखही नाही; याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!