Saturday, October 24, 2026
Homeभंडाराउपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तडीपाराची कारवाई केली प्रस्तावित

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तडीपाराची कारवाई केली प्रस्तावित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- तुमसर शहर व उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीमेत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता तुमसर शहरातील १७ जणांवर हद्दपारची कारवाई प्रस्तावित करण्यात अली आहे. यात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावले आहेत, यात दखलपात्र गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे असल्याचे कारण दिले आहे.

मुंबई पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ५९ (१) अन्वये हे नोटीस बजाविण्यात आले आहे.नोटीस बजाविण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्याविरुद्ध गुन्हे संबंधात लेखी स्वरूपात स्पष्टीकरण सादर करून बचाव करण्याच्या दृष्टीने लेखी व समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात व गावात वातावरण शांतता भंग करणे, तसेच गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगारांसोबत राहून शस्त्र बाळगणे, लोकांना धमक्या देऊन जनतेत दहशत निर्माण करणे, आदी कारणे देण्यात आली आहेत.इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच हद्दपारचे आदेश पोलिस विभागाने काढले असून,त्यात तुमसर येथील व्यक्तींचा समावेश अधिक आहे.बनावट रॉयल्टी वापरून रेती चोरी करणे या गुन्ह्याचा समावेश हद्दपारिकरिता गृहीत धरण्यात आला आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती चोरी करणे,चोरीची रायल्टी वापरणे हा येथे शिष्टाचार समजला जातो. त्यामुळे ही कारवाई राजकीय दबावातून तर करण्यात आली नाही ना..! अशी चर्चा सध्या तुमसर व मोहाडी तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांनी घेतलेला असामाजिक तत्त्वावर हद्दपारीचा निर्णय निश्चितच घ्यावा; परंतु त्यातही पारदर्शकपणा असण्याची गरज आहे.अन्यथा ‘आम्ही करू ती पूर्वदिशा’ असे व्हायला नको.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!