Thursday, July 16, 2026
Homeमुंबईलाखो समर्थकांचा जनसागर मुंबईच्या दिशेने-आजपासून मराठा आरक्षण आंदोलकांचा आमरण उपोषण करण्याचा निर्धार….

लाखो समर्थकांचा जनसागर मुंबईच्या दिशेने-आजपासून मराठा आरक्षण आंदोलकांचा आमरण उपोषण करण्याचा निर्धार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- लाखो समर्थकांचा जनसागर घेऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अरबी सागराच्या दिशेने निघाले आहेत.ही वज्रमूठ शुक्रवारी मुंबईत धडक देण्यास सज्ज झाली आहे.तथापि,राज्यातील महायुती सरकारकडून मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.शेवटचे वृत्त हाती आले तोवर जरांगे मुंबईत येण्याच्या हट्टावर ठाम होते.मुंबईत पोहोचल्यावर आज पासून म्हणजेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे हे वादळ मुंबईच्या उंबरठ्यावर म्हणजे वाशी- खारघरपर्यंत येऊन थांबल्याचे वृत्त आहे.मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. गुरुवारची रात्र मुंबईच्या वेशीवर काढल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी हा ताफा मुंबईकडे दाखल करण्यात आला आहे.लाखोंच्या संख्येने असलेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजून मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाखोंच्या संख्येने असलेले मराठा आंदोलक सामावू शकतील अशी एकमेव जागा म्हणजे खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान हीच आहे.मराठा आंदोलकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये अशी जागा सरकारने सांगावी,असे उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने आंदोलकांसाठी नवी मुंबईतील खारघर मैदान हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले आहे.

वाहतूक व्यवस्था कोलमडणार: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.वेगवेगळ्या वित्तीय संस्थांची कार्यालये या शहरात आहेत.तसेच इतर केंद्रेही आहेत. जवळपास ६० ते ६५ लाख चाकरमानी दररोज शहरात लोकल आणि दळणवळणाच्या अन्य साधनांनी प्रवास करतात.मराठा आंदोलक त्यांची वाहने घेऊन एवढ्या मोठ्या संख्येने शहरात आले, तर त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसेल.संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल;असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!