Saturday, June 20, 2026
Homeदेसाईगंजउद्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन….- देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी होणार आंदोलनात सहभागी

उद्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन….- देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी होणार आंदोलनात सहभागी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या हक्काच्या प्रलंबित मागण्यासाठी १८ डिसेंबर ते २० डिसेबर पर्यंत काम बंद आंदोलनाची हाक दिल्याने त्याला संलग्न असलेल्या देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनी तिन दिवस काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.त्या अनुषंगाने त्यांनी नुकतेच संवर्ग विकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांना  निवेदन सादर केले आहे.ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बऱ्याच मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी हे आपल्या मध्यवर्ती संघटनेच्या हाकेला साथ देत १८ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ रोजी काम बंद आंदोलन करणार आहेत.सदर आंदोलनाला देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार सेनेने पाठिंबा देऊन सदर आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला असून  त्याबाबतचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी  व विस्तार अधिकारी पंचायत समिती देसाईगंज यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!