Thursday, June 4, 2026
Homeचंद्रपूरअन् त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांचाच केला वापर…..-बनावट अकाऊंट प्रकरण…

अन् त्यांनी चक्क पोलीस अधीक्षकांचाच केला वापर…..-बनावट अकाऊंट प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हेगार थेट पोलिस अधीक्षकांच्या नावाने असलेल्या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे.यासंदर्भात पोलिस अधिक्षक रवींद्र सिंह परदेशी  यांनी त्यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार झाल्याचे मान्य केले आहे.

ओटीपीद्वारे नागरिकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेणे,महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे,फेसबुक खाते हॅक करून संबंधितांच्या नावाने पैशांची मागणी करणे,यासह आधुनिक काळात आभासी विद्वत्तेच्या आधारे थेट एखाद्या व्यक्तीच्या आवाजात फोन करून पैशांची मागणी करणे अथवा एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील चित्रफिती बनवणे नित्याचेच झाले आहे.गुन्हेगारांना बेकायदा संरक्षण देण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या बनावट फेसबूक खात्याचा वापर करू शकतात.प्राप्त माहितीनुसार हे गुन्हेगार थेट पोलिस अधीक्षकांच्या नावाने असलेल्या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे.यासंदर्भात पोलिस अधिक्षकांनी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार झाल्याचे मान्य केले आहे. 

रवींद्र सिंह परदेशी जिल्हा पोलिस अधिक्षक,चंद्रपूर👇

माझ्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार केले. असून माझ्या नेली फ्रेंड् रिक्वेस्ट कुणीही स्वीकारू नये; मी कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नसून हे गुन्हेगारांचे कृत्य असल्याने त्या अकाऊंटला ब्लॉक करून फेसबुकला रिपोर्ट करावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!