Wednesday, September 23, 2026
Homeदेसाईगंजजंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा....- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले...

जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव परिसरात वळविला मोर्चा….- शेतकरी बांधवांच्या धानांचे केले नुकसान…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज( गडचिरोली) :- एकीकडे देसाईगंज तालुक्याच्या काही भागांमध्ये वाघ,वाघीण यांची दहशत आहे.अशातच आता जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी बांधव चिंतातुर झाले आहेत.मागील दोन महिन्यांपासून कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी तालुका परिसरात संचारत असलेल्या रानटी हत्तींनी दोन दिवसांपूर्वी भगवानपूर शेतशिवारात धुमाकूळ घातल्यानंतर आता हत्तींनी पुन्हा देसाईगंज तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे.तालुक्यातील विसोरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हत्तींनी विहिरगावच्या शेताशिवारात प्रवेश करीत पीके पायाखाली तुडविली आहेत.यामुळे अनेक हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असून या हत्तींना तात्काळ हाकलून लावण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

हलक्या व मध्यम प्रतीचे धानपिक आता अंतिम टप्प्यात येत असताना २० पेक्षा वरच्या संख्येत असणाऱ्या जंगली हत्तींचे कळप काल विहीरगावच्या नजीक असणाऱ्या मामा तलावाच्या खालील धानपिकाच्या शेतातून गेले.त्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.यात प्रवीण डोनाडकर,बंडू बनकर, लीलाधर पिल्लेवान,सुधाकर बावणे,नांदाजी नारनवरे या विहीर गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना जंगलातील वाघाची भीती असताना आता रानटी हत्तींचाही धोका वाढला आहे. आतापर्यंत वाघाद्वारे या भागात कोणतीही हानी जरी नसली तरी शेतकऱ्याच्या जीवाला वाघापासून धोका आहे.त्यात आता जंगली हत्तींद्वारे धान पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.या पट्ट्यामध्ये धान पिकाचे सर्वात जास्त पीक घेतले जाते.धानपिक आता ऐन शेवटच्या टप्प्यात आले असताना हत्ती नुकसान करत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.जंगली हत्तींना पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगाल येथील एक टीम येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.मात्र अजूनही सदर टीम न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!