Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरपावणे तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण कर्त्यास दोन तासांत पोलीसांनी ठोकल्या बेड्या.....- नागपूर...

पावणे तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण कर्त्यास दोन तासांत पोलीसांनी ठोकल्या बेड्या…..- नागपूर इतवारी रेल्वे स्थानक परिसरातील घटना….. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- राजू दिलीप छत्रपाल वय ३४ वर्षे नागपूरच्या दहिबाजार पुला जवळ वास्तव्यास राहत असून धंतोलीच्या एका लॅब मध्ये काम करतात.काल १७ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पश्चिम बंगालला जाण्यासाठी रेल्वे गाडीचे आरक्षण करण्यासाठी आपल्या पावणे तीन वर्षाच्या मुलीला नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकावर घेऊन गेले असता गर्दीमुळे त्यांनी आपल्या चिमुकलीला कडेवरून खाली उतरविले व आवश्यक असणाऱ्या कामात मग्न झाले असता; श्यामकुमार पूनितराम ध्रुव वय ३० वर्षे छत्तीसगढ,बिलासपूर येथील मुंगेरी गावातील रहिवासी असलेल्या आरोपीने संधी साधून वडिलांच्या कडेवरुन खाली उतरलेल्या चिमुकलीला घेऊन पळ काढला.मुलगी दिसत नसल्याने वडील राजू यांनी आरडाओरड केली व रेल्वे पोलिसांना याबाबत सर्व हकीकत सांगितली.लगेच रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी शोध मोहीम राबविली.शोध मोहिमेत परिसरातील व शहरातील संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरे पिंजून काढण्यात आले असता एका ऑटोरिक्षामध्ये आरोपी श्यामकुमार चिमुकलीला घेऊन जातांना आढळला; सदर रिक्षाचालक याच्याशी पोलीसांनी संपर्क साधला असता नागपूरच्या मुख्य रेल्वे परिसरात आरोपी असल्याचे दिसून येताच पोलीसांनी दोन तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्याने सर्वांनी सुटकेचा नी:श्वास सोडला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!