- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथील एमएसडब्लू(MSW) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे २१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत क्षेत्रकार्य संपन्न झाले.या कालावधीत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व शैक्षणिक उद्दिष्टे समोर ठेवून शाळेत विविध उपक्रम राबविले.या क्षेत्रकार्यात प्रियंका ठाकरे,सपना भागडकर,प्राची पिलारे,उमा खंडाते,मीना चवारे आणि भावेश शेंडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील स्वच्छता,विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयींची जोपासना तसेच सामाजिक जाणीव जागृत करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले.याअंतर्गत स्वच्छता अभियान,हात धुवा कार्यक्रम आणि निबंध स्पर्धा यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व,आरोग्यविषयक सवयी आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.क्षेत्रकार्याच्या माध्यमातून एमएसडब्लू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळाला,तसेच शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात आले.
२६ ऑक्टोंबर रोजी क्षेत्रकार्याच्या समारोपानिमित्त शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून क्षेत्रकार्यादरम्यान मिळालेल्या अनुभवांना उजाळा दिला.यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे छायाचित्र शाळेला भेट म्हणून देण्यात आले.या भेटीतून सामाजिक परिवर्तन,संघर्ष आणि प्रेरणादायी विचारांचा संदेश देण्यात आला.
या निरोप समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक प्रधान, शिक्षक मिसार,निकोडे,नन्नावरे,लांजेवार तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्य यशस्वीरीत्या पूर्ण करता आले.या क्षेत्रकार्यामुळे विद्यार्थ्यांना समाजकार्याच्या सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळाला.शाळा आणि समाज यांच्यातील समन्वय दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी,स्वच्छतेची जाणीव आणि समाजाप्रती उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने हे क्षेत्रकार्य महत्त्वपूर्ण ठरले.
- Advertisement -

