Monday, October 12, 2026
Homeदेसाईगंजअखेर 'त्या' तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-गोंदिया मार्गावरील तुकुम परिसरातील रेल्वे रुळावर उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.रेल्वे रुळावर शरीराचे दोन तुकडे होऊन शरीराचा अर्धा भाग एकीकडे,तर अर्धा भाग रेल्वे रुळावर आढळून आला होता.दरम्यान,घटनेची माहिती तात्काळ देसाईगंज रेल्वे प्रशासन व देसाईगंज पोलिसांना मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला होता. त्यानुसार,सदर तरुण हा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली.शंकर केशव बेदरे वय २५ वर्षे, रा.कन्हाळगाव असे मृत तरुणाचे नाव असून त्याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेमुळे कन्हाळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बेदरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेनंतर मृतदेह देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला व शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून...

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!