Saturday, October 3, 2026
Homeनागपूरसंशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या हैवान पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली.सुरुवातीला त्याने पत्नीच्या हत्याकांडाला अपघाताचे स्वरूप दिले खरी,पण शवविच्छेदन अहवालात त्याचे खरे रूप समोर आले.ही घटना नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामगारनगरातील म्हाडा क्वॉर्टरमध्ये घडली. लक्ष्मी रोशन शाहकार वय ३५ वर्षे, असे मृतक पत्नीचे नाव आहे.तर रोशन किशोर शाहकार वय ४२ वर्षे असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी रोशनला काही दिवसांपासून पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.गुरुवार १ ऑक्टोंबरच्या रात्रीही दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला.वाद वाढल्यानंतर रोशनने लक्ष्मीला बेदम मारहाण केली.यात ती गंभीररीत्या जखमी झाली.त्यानंतर,त्याच रात्री रोशनने तिला रुग्णालयात नेले.रुग्णालयात डॉक्टरांनी लक्ष्मीला मृत घोषित केले.डॉक्टरांनी त्यास विचारणा केल्यावर पायऱ्यांवरून पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याचे डॉक्टरांना सांगितले.रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.दरम्यान, शवविच्छेदन अहवालात लक्ष्मीच्या शरीरावर अंतर्गत दुखापती आढळून आल्याने पोलिसांना मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.पोलिसांनी रोशनची कसून चौकशी केली असता पत्नीला मारहाण केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर,पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली.विशेष म्हणजे,रोशनविरुद्ध यापूर्वीही पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल होता.रोशनने २००६ मध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती.या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान तो कारागृहातून जुलैमध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी नात्यातील लक्ष्मीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि पुढे दोघांनी विवाह केला.त्यांना तीन आणि सात वर्षांची दोन मुले आहेत.संबंधित हत्या प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर रोशन आरटीओ एजंट म्हणून काम करू लागला.दरम्यान,रोशन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वारंवार वाद घालायचा,यातूनच त्याने पत्नीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे तीन आणि सात वर्षाच्या दोन मुलांवरील ममतेचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

सहपालकमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांचा आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांची वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत.खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन प्रत्येक कामाची गुणवत्ता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!