Friday, October 2, 2026
Homeदेसाईगंजश्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध सांस्कृतिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्वच्छता,सामाजिक बांधिलकी,विद्यार्थी संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अंबाजी आमनर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे,जीडीसीसी को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक चेतन कांबळे,बीआरसीचे सोरते व नगरसेविका ज्योत्सना लुटे उपस्थित होत्या.तसेच मुख्याध्यापक खेमराज तिघरे व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामेश्वर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी शाळेच्या स्वच्छता व विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीने नवीन हँडवॉश स्टेशन उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.हे काम केवळ शाळेचे न राहता संपूर्ण गावाच्या सहभागातून व्हावे, यासाठी गावातील तरुणांनी व पालकांनी वर्गणी, श्रमदान,आर्थिक तसेच तांत्रिक मदतीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले. “शाळा ही केवळ विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असा सामाजिक सहभागाचा संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सामाजिक व शैक्षणिक संदेश देण्यात आले.विशेषतः ‘मोबाईलचा अति वापर’ या विषयावरील संदेशपर नाटकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांना व पालकांना डिजिटल शिस्तीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
जयंतीनिमित्त जगदंब ग्रुप व टायगर ग्रुप यांच्या वतीने शाळा परिसरात श्रमदान करण्यात आले.शाळेला देणगी देऊन सहकार्य करणाऱ्या कल्पना ठाकरे,लुणकरण चौधरी व आकाश घोरमोडे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या जगदंब ग्रुप व टायगर ग्रुपचाही गौरव करण्यात आला.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थी सक्षम गजानन कवासे याचा पालकांसह कल्पना ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी रामेश्वर कांबळे,सोरते, कल्पना ठाकरे व ज्योत्सना लुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अन्नाजी तुपट,गंगाधर चांदेवार,प्रदीप ठाकरे,रामलाल बगमारे,पल्लवी बगमारे,वैशाली मेश्राम,रागिनी मिसार,अस्मिता पचारे,शिक्षक
हाके,गहाणे,येळणे,शिक्षिका अपर्णा,प्रियंका,प्राची यांच्यासह पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मंगेश तुपट यांनी केले,तर शिक्षिका भारती यांनी आभार मानले.
गांधी-शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून ‘स्वच्छ शाळा,निरोगी विद्यार्थी,जागरूक पालक आणि सहभागी समाज’ ही संकल्पना अधोरेखित झाली.श्रमदानातून स्वच्छता,सत्कारातून कृतज्ञता, नाटकातून जनजागृती आणि हँडवॉश स्टेशनच्या संकल्पातून आरोग्याचा संदेश देत नैनपूर शाळेने समाजसहभागातून शैक्षणिक परिवर्तनाची प्रेरणादायी दिशा दाखविली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम लागू करा; अन्यथा देशव्यापी तीव्र आंदोलन व जनगणनेवर बहिष्कार.. -सकल ओबीसी संघटनेचा इशारा; आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाज सहभाग नोंदवणार नाही. ड्रॉप-डाऊन मेन्यु व स्वतंत्र काॅलम लागु करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!