- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.कुणाल रूषीजी मेश्राम वय ३७ वर्षे, गांगलवाडी,अज्ञान विठोबा महाडोरे वय ३२ वर्षे, बरडकिन्ही,सुनील वासुदेव मेश्राम वय ३२ वर्षे, गजानन महाडोरे वय ३५ वर्षे,सुधीर शेंडे वय ३७ वर्षे,अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ३ मोबाइल,रोख २ हजार ६३० रुपये, दोन लोखंडी कात्या तसेच दोन दुचाक्या असा एकूण १ लाख ६९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नुकतेच २७ सप्टेंबर रोजी पोलिस अंमलदार अमोल लोनबले हे मेंडकी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत गस्त घालत असतांना त्यांना बरडकिन्ही जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र,पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

